छगन भुजबळांचा जामीन मंजूर झाल्याने नाशकात समर्थकांचा जल्लोष
नाशिक, दि. 05, मे - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन वर्षाच्या कालावधीनंतर जामीन मंजूर झाल्याने नाशिक शहर, येवल्यासह जिल्ह्यात समर्थकांनी फटक्यांची आताषबाजी करत जल्लोष साजरा केला. तसेच एकमेकांना पेढे वाटत आनंद उत्सव साजरा केला.
आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास भुजबळ यांना पाच लाख रुपयांचा जामीन न्या. पी. एन. देशमुख यांनी मंजूर केला. त्यांच्या जामिनाचे वृत्त समजताच नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर, राष्ट्रवादी क ार्यालय व येवल्यातील संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे.