Breaking News

पाकच्या हल्ल्यात निमगावचा जवान बचावला


शिर्डी : निमगाव-कोऱ्हाळे या गावातील सुरक्षा जवान राजेंद्र जगताप हा जम्मू काश्मिरमध्ये साबा बॉर्डरवर कर्तव्यबजावत होता. त्यावेळी पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सुदैवाने तो बचावला. भारतीय जवानांनी केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे काही वेळ चांगलीच धुमश्चक्री झाली. मागील आठवड्यात {दि. २३} सकाळी ८:३० च्या सुमारास ही धुमश्चक्री झाली होती. 
साबा बॉर्डर सीमाचौकी भागात जम्मू काश्मिर याठिकाणी तैनात होते. पाकिस्तानच्या सैनिकांनी बॉम्बचा मारा

केला. जवळपास १६ बॉम्ब पाकिस्तानी सैनिकांनी फायर केले. भारतीय सेनेकडून निमगाव येथील मेजर राजेंद्र जगताप व त्यांच्या सहकार्यांनी ए. एम. आर. गनने फायर करून पाकिस्तानी सेनेचे २ बंकर, एक टॉवर, इमरान पोस्ट उध्वस्त केले. फायर करण्यासाठी

जगताप पुढे गेले असता त्यावेळी पाकिस्तानी जवानांनी एन.एम.जी.मोर्चावर रॉकेट लॉंचरने फायर केले. या हल्ल्यात भारतीय जवान जखमी झाले. देशसेवेसाठी लढताना जीवाची पर्वा न करता लढण्याचा या पराक्रमाची माहिती निमगाव ग्रामस्थांना समजल्यानंतर सर्वांनी या जवानांचे अभिनंदन केले. 

मेजर जगताप गावचे भूषण

जम्मूकाश्मिर सीमेवर देशसेवेसाठी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणारे आमचे जवान आमची अस्मिता आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जोरदार प्रतिकार करताना काही जवान जखमी झाले. मात्र राजेंद्र जगताप हे बचावले आहेत. देशसेवेसाठी करत असलेली कामगिरी व त्यांचे योगदान हे आमच्या गावासाठी भूषण ठरणारी बाब आहे. 

शिल्पा कातोरे, सरपंच.