Breaking News

श्रीरामपूर येथे स्वांतत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी


श्रीरामपूर - स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, क्रियाशील समाजसुधारक होते. असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. नगरपरिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालयात स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले यावेळी त्या बोलत होत्या.
 
यावेळी एमआयडीसीचे चेरमन बाबासाहेब काळे , नगरसेवक मनोज लबडे, कलीम कुरेशी, राजेद्र पानसरे, समित मुथ्था, मिस्टर शेलार, अमित मुथ्था, जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी, ग्रंथपाल स्वाती पुरे आदि उपस्थित होते.
आदिक पुढे म्हणाल्या की सावरकर भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण होते . त्यांनी विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला होते.

यावेळी एमआयडीसीचे चेअरमन बाबासाहेब काळे , नगरसेवक मनोज लबडे, कलीम कुरेशी, राजेद्र पानसरे, समित मुथ्था, मिस्टर शेलार, अमित मुथ्था, जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी, ग्रंथपाल स्वाती पुरे आदि उपस्थित होते .