Breaking News

अण्णाभाउ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी आ.रमेश कदम बीड न्यायालयात हजर

बीड, दि. 20, जुलै - अण्णाभाउ साठे महामंडळात झालेल्या कोटयावधी रूपयांच्या घोटाळा प्रकरणी आमदार रमेश कदम यांना बीड न्यायालयात हजर करण्यात  आले होते. गेल्या तीन चार वर्षापुर्वी हा महाघोटाळा उघडकीस आला.या प्रकरणी आ. कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता अजुनही ते न्यायालयीन  कोठडीत आहेत.सदर महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी बीडमधेही एक गुन्हा दाखल झाला होता म्हणून या प्रकरणी चौकशीसाठी त्यांना बीडच्या न्यायालयात आज  हजर करण्यात आले होते.