Breaking News

विशेष संपादकीय - मंत्रालयात आले बाराशे ट्रक्स डबर, बाहेर गेले नऊशे ट्रक्स डेब्रीज! पण कुणी कुणी पाहीले...?

सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या क्षेत्रिय अभियंत्यांनी आपले पाप छगन भुजबळांच्या खात्यावर जमा करून आपले उखळ पांढरे करून घेतले. नेमक ी तीच चाल खेळून विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत दादा पाटील यांचाही कार्यक्रम लावण्याची तयारी साबांतील भ्रष्ट बंडू करीत आहेत. शनिवारी साबांतील बंडूगीरी या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या विशेष संपादकीय लेखात या प्रवृत्तींचा कर्मजोखा प्राथमिक स्वरूपात मांडला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या मंडळींनी चंद्रकांत दादा पाटील यांनी बांधकाम विभागाचे मंञी म्हणून पदभार घेतला त्या दिवसापासून सरकारच्या पारदर्शक कारभाराच्या विरोधात भुमिका घेण्यास सुरूवात केली.
आनंद कुलकर्णी यांच्याकडे साबां प्रधान सचिव पदाचा प्रभारी पदभार असताना त्यांचे पट्टशिष्य म्हणून साबांत परिचीत असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या गुरू ला दालन सुशोभीकरणाची गुरू दक्षिणा देतानाही तब्बल 45 लाखांचा अपहार केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. केवळ शासकीय निधीचा अपव्यय एवढ्या पुरते हे प्रकरण मर्यादीत नाही, तर या कामांचे तुकडे पाडून स्पिल्ट अप करण्याचा प्रमादही केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनालाही लाजवेल इतका खर्च या प्रधान सचिवांच्या नऊशे चौ. फुट दालनाचे सुशोभीकरण करण्यासाठी केल्याने या कार्यकारी अभियंत्यांची बंडूगीरी साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना अडचणीत आणण्याचा पहीला टप्पा होता. या दालनावर झालेला एवढा खर्च पाहून कुलकर्णींच्या निवृत्तीनंतर प्रधान सचिव म्हणून पदभार घेतलेले आशिषकुमार सिंह हे सुध्दा अवाक झाले आहेत.
छगन भुजबळांना क्लीन चीट देऊन चंद्रकांत दादांना संशयाच्या फेर्‍यात अडकविण्याचे कृष्णकृत्यसही या बंडू प्रवृत्तीने केले.
याच काळात मंञालय इमारतीत बाराशे ट्रक काळा दगड आला, नऊशे ट्रक डेब्रीज मंत्रालयाच्या बाहेर गेले.आठशे तीस मजूरांनी एकाच दिवशी मंत्रालय आवारात कष्ट उपसले. एका बाजूला एवढे सारे घडत असताना नेहमी गजबजलेला मंत्रालय परिसर मात्र या सर्व घटनाक्रमांपासून अनभिज्ञ होता. कमाल म्हणायला हवी या कार्यकारी अभियंत्यांची!
या काळात म्हणजे सन 2015-16 या आर्थिक वर्षात मंत्रालय आवारात कुठलीच जुनी इमारत पाडली गेली नाही, तरी देखील या कार्यकारी अभियंत्याच्या बंडूगीरीतून तब्बल नऊ शे ट्रक्स डेब्रीजची उपज झाली. या काळात मंत्रालय परिसरात नवीन इमारतही उभी राहील्याची नोंद नाही तरीदेखील या बंडू प्रवृत्तीने बाराशे ट्रक्स काळा दगड मंञालयात आणून पचवला.
विशेष म्हणजे ज्या दिवशी काळा दगड आणणार्‍या ट्रक्स मंत्रालयात आल्या, नऊशे ट्रक्स डेब्रीज ट्रक्स मंत्रालयाच्या बाहेर पडल्या, आठशे तीस मजूर मंत्रालय आवारात काम क रण्यासाठी आले, त्या प्रत्येकाची नोंद मंत्रालय प्रवेशद्वारावर बंदोबस्तास असलेल्या गृहखात्याच्या पोलीसांकडे सापडत नाही, सामान्य प्रशासन विभागाच्या दप्तरातही या घडामोडींची नोंद नाही, याचा अर्थ मंत्रालयाची इमारत सांभाळणार्‍या सामान्य प्रशासन विभागाला आणि मंत्रालयाचे राखण करणार्‍या गृह विभागाला या कार्यकारी अभियंत्यांनी अंधारात ठेवले. सामान्य प्रशासनाच्या आणि गृह विभागाच्या परवानगीशिवाय मंत्रालयाच्या आवारातून टाचणीही बाहेर जाऊ शकत नाही किंवा आत येऊ शकत नाही.तरीही आठशे तीस मजूरांसह दोन हजार शंभर ट्रक्सचा वावर झाला. यातून कुठला अर्थ काढायचा? प्रत्यक्षात हे घडले असते तर या यंत्रणांकडे नोंद नक्कीच सापडली असती, साबांच्या शहर इलाखा विभागात मात्र या सर्व नोंदी आढळतात. यावरून साबांतील या बंडूंनी केवळ कागदोपत्री हा पराक्रम केल्याचे स्पष्ट होते.
हा घोटाळा किमान 15 कोटी रुपयांचा आहे. एक जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या काळात खोट्या निविदा स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांच्या नावे मंजूर करुन निविदेतील शर्थी अटी प्रमाणे कुठेल्याही स्वरूपाची कामे न करता 15 कोटी रुपयांचा अपहार तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे.
बनावट दस्तावेज बनवणे, खोट्या निविदा, खोटी अंदाजपत्रके, खोटी देयके, मोजमाप पुस्तकात न केलेल्या कामांची खोटी नोंद करुन ती देयके शाखा अभियंता, उप अभियंता, क ार्यकारी अभियंता यांनी स्वाक्षरी करुन अदा करुन किमान 15 कोटी रुपयांचा शासनाच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा टाकला.
मुंबई शहर इलाखा साबां विभागात सुरू असलेला भ्रष्टाचाराचा हा उच्छाद नेहमीच्या भ्रष्टाचाराचा प्रकार नाही. तर ही चाल आहे. राज्याच्या मुख्यालयातच हा गोंधळ झालेला असल्याने जनतेला उत्तरदायी असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर त्याची अंतिम जबाबदारी येते, उत्तर त्यांना द्यायचे आहे. हे माहीत असलेल्या मंडळींनी शहर इलाखा विभागात हैदोस करून बढतीवर बदली करून घेतली. बदनामी मात्र चंद्रकांत दादांच्या माथ्यावर सोडली. हे एक षडयंत्र आहे. यात एकटे तत्कालीन बंडू कार्यकारी अभियंता तथा विद्यमान अधिक्षक अभियंता नाहीत तर मुंबई साबां अधिक्षक कार्यालयातून मिळणारे मार्गदर्शन आणि पाठींबा या तत्कालीन कार्यकारी अभियंता तथा विद्यमान अधिक्षक अभियंत्याचे मनोधैर्य वाढवित आहे.
या कार्यकारी अभियंत्याने शहर इलाखा विभागात केलेल्या प्रतापाची चौकशी करण्याची संधी घेऊन साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना खोटा अहवाल सादर करण्याचे पाप करू न मैत्री निभिवली जात आहे. तर दुसर्‍या बाजुला मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणि अधिवेशन काळात सभागृहात या घोटाळ्याच्या मुद्यावर मंत्र्यांना तोंडघशी पाडून त्यांच्या बदनामीचा हेतू साध्य केला जात आहे.