नाशकात राष्ट्रवादी महिलांकडून इंधन दरवाढीचा निषेध
नाशिक - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अ निता भामरे यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीचा निषेध करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
भाजपा सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. पण मात्र महागाईकडे दुर्लक्ष केले. सर्व क्षेत्रात महागाईच्या खाईत जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक इंधन दरवाढीचा फटका बसत असल्याने संपूर्ण कुटुंबाला आर्थिक झळ बसत आहे. संपूर्ण देशात नासिक मध्ये पेट्रोल रूपये 85.07 पैसे तर डिझेल रू पये 71.66 पैसे दराने विक्री होत आहे.
यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन इंधनावरील अवाजवी सेस अधिभार रद्द करून जीएसटी कक्षेत आणावा. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. अन्यथा राष्ट ्रवादी महिला काँग्रेस शहरातील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून लहान मुलांची खेळण्यातील गाडी (खेळणी) सरकारला भेट देण्यात आली.
