Breaking News

अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन


मुंबई : ’पाकिजा’ फेम अभिनेत्री गीता कपूर यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. मात्र त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्‍न कायम आहे. गीता यांचा मुलगा राजा 21 एप्रिल 2017 रोजी आपल्या वृद्ध आईला गोरेगावच्या एसआरव्ही रूग्णालयाच्या दरवाजात टाकून तिथून निघून गेला होता. त्यानंतर निर्माते रमेश तौरानी आणि अशोक पंडित यांनी पुढाकार घेऊन गीता यांची जबाबदारी घेतली. मात्र उपचारासाठी दाखल झाल्यावर महिन्याभरापासून त्यांनी आपलं जेवण सोडून दिले होते. दिवस रात्र त्यांच्या तोंडी मुलगा राजाचंच नाव होतं. माझा राजा येणार असं त्या कायम म्हणायच्या. मात्र आज अखेर वृद्ध शरीराने साथ सोडली आणि त्यांचे निधन झाले.