Breaking News

25 ते 29 मे सोलापूरहून दक्षिण भारताकडे जाणार्‍या व येणार्‍या रेल्वेसेवा विस्कळीत होणार


सोलापूर - सोलापूर ते गुलबर्गा सेशनमध्ये अक्कलकोट रोड ते नागणसूर दरम्यान जवळपास 15 किमी दुहेरीकरणाचे काम झाले आहे. आता जिथे काम झाले आहे त्या स्थानकांवर नॉन इंटरलॉकिंगचे काम 25 ते 29 मे कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरहून दक्षिण भारताकडे जाणार्‍या व येणार्‍या रेल्वेसेवा विस्कळीत होणार असून पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला.
 
या पॅसेंजर गाड्या रद्द हैदराबाद-विजापूर,विजापूर -बोलाराम, सोलापूर -गुंटकल, वाडी - सोलापूर, सोलापूर -फलकनामा, रायचूर -विजापूर, विजापूर -रायचूर, गुलबर्गा - सोलापूर या पॅसेंजर गाड्या 25 ते 29 मे दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
 
या गाड्यांचा मार्ग बदलला 26 ते 29 मे या कालावधीत कुर्ला -विशाखापट्टणम (18520), विशाखापट्टणम -कुर्ला (18519), भुवनेश्‍वर -मुंबई कोणार्क (11020), हैदराबाद -मुंबई (12702), सिकंदराबाद -राजकोट (17018), मुंबई -भुवनेश्‍वर कोणार्क (11019) या गाड्या सोलापूर स्थानकावरून न धावता सिकंदराबाद, विकाराबाद, लातूर रोड, कुर्डुवाडी मार्गे धावणार आहे. तर मुंबई -बेंगळुरु उद्यान (11301) व चेन्नई मुंबई मेल (11028) या दोन गाड्या होटगी, गदग, बेल्लारी, गुंटकल मार्गे धावणार आहे.
 
सोलापूर -यशवंतपूर एक्स्प्रेस ही 27 मे रोजी सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान न धावता गुलबर्गा ते यशवंतपूर दरम्यान धावणार आहे. तर 26 व 27 मे रोजी चन्नई मेलला गोंदिया एक्स्प्रेसचा अतिरिक्त डबा दौंड स्थानकावर जोडला जाणार नाही.