महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू
सोलापूर, दि. 05, मे - महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम दुसर्या दिवशी सुरू होती. सात रस्ता परिसर, स्टेशन परिसर ते नवीवेस पोलिस चौकीपर्यंतचे अतिक्रमण हटवण्यात आले. मोहीम महापालिकेने सुरू केली असली तरी, पार्किंगची समस्या मात्र जैसे थे आहे. अनधिकृत डिजिटल फलक लावले जात आहेत. पार्किंगच्या जागा मोकळ्या केल्यास रस्त्यावरील पार्किंग बंद होईल. याबाबत महापालिका बांधकाम परवाना विभागाकडून नोटीस देण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
70 फूट रोडवर भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने चिप्पा मार्केट मोकळेच आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष देऊनही आजही रस्त्यावर अतिक्रमण आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौक ते वाडिया हॉस्पिटल मार्गावर रस्त्यावर भाजी विक्री सुरू असते. वाडिया हॉस्पिटल ते माजी महापौर आरिफ शेख यांच्या निवास स्थानाकडे जाणारा रस्ता काही काळ बंद असतो. दत्त चौक ते समाचार चौकपर्यंत रस्त्यावर वाहने असल्याने वाहतूक कोंडी होते.