विधान परिषद कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक रंगतदार
रत्नागिरी, दि. 05, मे - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची येत्या 21 मे रोजी होणारी निवडणूक रंगतदार ठरणार आहे. शिवसेनेतर्फे अॅड. राजीव साबळे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिकेत तटकरे या दोघांचेच अर्ज दाखल झाले असून निवडणूक दुरंगीच होणार आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेनेची मक्तेदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांनी मोडून क ाढली. अनिल तटकरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ही जागा पुन्हा जिंकली. यावेळच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती असली, तरी भाजपचे खा. नारायण राणे यांनी शिवसेनेचा उमेदवार जिंकू देणार नसल्याची घोषणा केल्याने आता तिसर्यांदा अनिकेत तटकरे निवडून आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची हॅटट्रिक साधली जाणार आहे.
आ. भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे अनंत तरे यांचा पराभव क रून जाधव यांनी या मतदारसंघातील शिवसेनेची मक्तेदारी संपुष्टात आणली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीने गुहागर मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेथे तत्कलीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि डॉ. विनय नातू यांचा जाधवांनी पराभव केला. विधानसभेतील विरोधी पक्षाला हरविणे आणि गुहागर मतदारसंघातील भाजपची 20 वर्षांहून अधिक काळ असलेली सत्ता मोडीत काढणे असा दुहेरी पराक्रम जाधवांनी केला. विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल तटकरे आणि शिवसेनेकडून उमेश शेट्ये यांना उमेदवारी देण्यात आली. माणिक जगताप यांनी बंडखोरी केली होती. युतीमध्ये अंतर्गत कुरबुरी असल्यामुळे तेव्हा शेकापची मतेही राष्ट्रवादीकडे झुकली. सुनील तटकरे, नारायण राणे यांच्या मेहनतीला जयंत पाटील यांची साथ मिळाल्याने अनिल तटकरे विजयी झाले. यावेळी सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे राष्ट ्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे अॅड. राजीव साबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. याहीवेळी युतीमध्ये बेबनाव असल्यामुळे हॅट्रीक साधण्याची राष्ट्रवादीला मोठी संधी आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची ही जागा भाजपने राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला सोडली. मात्र स्वाभिमान पक्षाने स्वतःचा उमेदवार उभा करण्याऐवजी भाजपला पाठिंबा दिला. मात्र भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पडद्यामागून पाठिंबा दिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राणेंनी शिवसेनेचा उमेदवार जिंकू देणार नाही, असे जाहीर केले. राणेंची कोंडी आणि शिवसेनेचा उमेदवार जिंकून येऊ द्यायचा नाही, याची काळजी घेऊन भाजपने या निवडणुकीत एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या खच्चीकरणाचे प्रयत्न भाजपकडून वेळोवेळी झाले. दुसरीक डे राणेंचे ‘वजन‘ वाढू नये यासाठी भाजपमध्ये काहींचे प्रयत्न आहेत. कोकणची जागा राणेंना सोडून भाजपने त्यांच्या उमेदवाराला मदत केली, तर इतर मतदारसंघात शिवसेनेची भाजपला साथ मिळणार नाही, हे निश्चित होते. जाहीर घोषणेशिवाय युती करून भाजपने इतर मतदारसंघात सेनेची साथ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कोकण मतदारसंघात राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची 82 आणि शेकापची 39 ही निर्णायक मते आहेत. शेकापचे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे शेकापची मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राणे यांच्या टोकाचे वैर आहे. युती झाली तरी राणे शिवसेनेच्या उमेदवाराला अजिबात सहकार्य करणार नाहीत, हे निश्चित आहे. राणेंची मते विरोधी पक्षाला म्हणजेच राष्ट ्रवादीला मिळाली तर शिवसेनेची एक जागा कमी होईल, याच अपेक्षेने भाजपमध्ये घडामोडी झाल्याची चर्चा आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार - नगरसेवक - 600, जिल्हा परिषद सदस्य - 160, सभापती, उपसभापती - 35. एकूण मतदार 759.
पक्षीय बलाबल - सेना, भाजप - 315, स्वाभिमान - 82, काँग्रेस, राष्ट्रवादी - 334, मनसे - 25, शेकाप - 39.
मागील निवडणुकीत मिळालेली मते - अनिल तटकरे (राष्ट्रवादी) 347, उमेश शेट्ये (शिवसेना) (94), माणिक जगताप (अपक्ष) 132.