नाशिक विधान परिषद निवडणुकीतून दोघांची माघार
नाशिक, दि. 08, मे - नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठी आज दोघा उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली. विधान परिषद निवडणुकीत भाजप सेना युतीमुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय परवेज कोकणी हे माघार घेतील अशी चर्चा होती. मात्र कोकणी यांनी माघार न घेतल्यामुळे पाच जण विधान परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. असे असले तरी निवडणूक शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट ्रवादीचे अॅड. शिवाजी सहाने आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत बघावयास मिळणार आहे.
शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारडे जड आहे. तसेच भाजपनेदेी केल्यामुळे सेनेची ताकत वाढली आहे. शिवसेनेमधून हकालपट्टी झालेले अॅड. शिवाजी सहाने राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवून निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. अॅड. सहाने शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक गट होता तोही नाराज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अॅड. सहाने यांना बेरजेचे राजकारण क रत ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे राष्ट्रवादीतील भुजबळ समर्थक गट नाराज असल्याचे समोर आले आहे. परवेज कोकणी यांनी त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षदेखील कोकणी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गेले होते. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरल्यामुळे कोकणी यांच्या बाजूने काही मते जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीतील काही मते विभागली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला मात्र त्याचा राष्ट्रवादीला कितपत फायदा होईल हे तर येणारा काळच ठरवणार आहे.
