Breaking News

पालघर वगळता भाजपची पीछेहाट भंडारा-गोदिंयात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे तर पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावीत विजयी

मुंबई : देशातील 10 राज्यात 4 लोकसभा आणि 10 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीचे निकाल समोर आले असून, पालघर वगळता इतर जागांवर भाजपची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. तर भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत भाजपाचा राष्ट ्रवादी काँग्रेसने पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे हे उमेदवार होते तर भाजपाने हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती. नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून राष्ट ्रवादीचे कुकडे हे आघाडीवर होते. कुकडेंनी 40 हजारांहून अधिक मतांनी पटलेंचा पराभव केला.

काँग्रेसने विधानसभेच्या 10 जागापैकी चार जागा जिंकल्या असून त्यामध्ये पळूस कडेगाव, अंपती, राजराजेश्‍वर नगर व शाहकोटचा समावेश आहे. केरळमधल्या चें गन्नूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं विजय मिळवला. बिहारमध्ये जोकीघाटमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा विजय झाला. समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशमध्ये नूरपूरमध्ये विजय संपादन केला. झारखंडमधल्या दोन्ही जागा जेएमएमनं जिंकल्या. महेशथलाची जागा तृणमूलनं जिंकली असून भाजपाला उत्तराखंडमधल्या थराळी या एकमेव जागेवर विजय मिळवता आला आहे. तर लोकसभेच्या 4 जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यातली पालघरची एक जागा भाजपाला जिंकता आली आहे. तर कैराना या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये राष्ट्रीय लोक दलाचा विजय झाला, जो योगी आदित्यनाथ यांना धक्का मानण्यात येत आहे. भंडारा गोंदिया या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तर नागालँडमधली जागा एनडीपीपीनं जिंकली आहे.
पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम रा हिली. 28 व्या फेरीत गावित यांना 2,68,164 मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2,40,619 मतं मिळाली. तर तिसर्‍या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 2,16,953 मतं मिळाली. गावित 44589 मतांनी विजयी झाले. पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारीही दिली. तर भाजपनं का ँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक सुरशीची बनली होती. तर बहुजन विकास आघाडीने त्यांचे माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती.
*मेघालयात काँग्रेस विजयी
मेघालयमध्ये अंपाती मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा यांनी जी. मोमिन यांचा 3191 मतांनी पराभव केला. या विजयामुळे काँग्रेस क ार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. या निकालानंतर आता मेघालयमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी विजय मिळवला होता. मात्र, ते दोन ठिकाणाहून निवडून आल्याने त्यांनी अंपाती येथील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर येथे 28 मेला मतदान घेण्यात आले होते. पोटनिवडणुकीसाठी 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या निकालामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेसच्या विजयी उमेदवार मिआनी डी शिरा ह्या क ाँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि नेते मुकुल संगमा यांची मुलगी आहे.
* पंजाबमध्ये काँग्रेस सुसाट
पंजाबमध्ये आज झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार हरदेव सिंग लाडी यांनी 38808 मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 1992 नंतर या जागेवर पहिल्यांदाच काँग्रेसने विजय मिळवला आहे. निकालानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत का ँग्रेसचा मुकाबला थेट अकाली दल आणि आम आदमी पक्षाबरोबर होता. अकाली दलाच्या अजित सिंग काकोड यांच्या निधनामुळे या जागेसाठी 28 मे रोजी मतदान घेण्यात आले होते. 2017 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हरदेव सिंग लाडी थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.
*कर्नाटकातील राजाराजेश्‍वरीमध्ये काँग्रेसचा विजय
15 दिवसांपूर्वीच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजाराजेश्‍वरी मतदार संघातून आलेला निकाल काँग्रेसला मोठा दिलासा देणारा ठरला आहे. राजाराजेश्‍वरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्न हे 41 हजार 162 मतांनी विजयी झाले आहेत. बोगस मतदान ओळखपत्र सापडल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती.
कैरानात भाजपाला धक्का
भाजपा व विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणार्‍या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात होत्या. हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपाला आव्हान दिले. गोरखपूर आणि फुलपूरच्या परभवानंतर कैरानाचा पराभव भाजपासाठी धक्कादायक मानला जात आहे. कैरानामध्ये एकूण 17 लाख मतदार असून यापैकी 61 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचे प्रमाण मोठया संख्येने आहेत. गोरखपूर व फुलपूरमध्ये विरोधकांच्या संयुक्त उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता.