Breaking News

शारदा पतसंस्थेच्या चेअरमनपदी चांडक


संगमनेर : तालुक्याच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रतिमा चांडक यांची तर, व्हा. चेअरमनपदी सोनाली नावंदर यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात संचालकांच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. 

शारदा पतसंस्थेच्या इतिहासात संस्थेची धुरा महिलांच्या हाती देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने संचालक मंडळाच्या या निर्णयाचे शहरातून स्वागत होत आहे. यावेळी संचालक मंडळातील सदस्य सर्वश्री गिरीश मालपाणी, राजकुमार पोफळे, विशाल पडताणी, मनिष मनियार, कैलास राठी, राजेश रा.मालपाणी, राजेश लाहोटी, सुरेंद्रकुमार कासट, उमेश झंवर, डॉ.योगेश भुतडा आदींसह संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.