Breaking News

देशातल्या पहिल्या ‘फ्लोटिंग एलएनजी टर्मिनल’चे रत्नागिरी जिल्ह्यात उद्घाटन


रत्नागिरी, दि. 02, मे - येत्या 2030 सालापर्यंत देशात सर्वत्र स्वच्छ ऊर्जेचाच पुरवठा करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. ते साध्य करण्याच्या दिशेने महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 
रत्नागिरी जिल्ह्यात जयगड येथे जेएसडब्ल्यू ऊर्जा प्रकल्प आणि बंदरावर एच-एनर्जी संस्थेने उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोअरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी ट र्मिनलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
ते म्हणाले की, जो प्रकल्प उभारायला चार-पाच वर्षे लागली असती, तो हिरानंदानी उद्योग समूहाने अवघ्या सतरा महिन्यांत उभारला असून हे कौतुकास्पद आहे. देशातील अशा तर्‍हेचा हा पहिला प्रकल्प आहे. प्रकल्पाकरिता अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. एलएनजी ही देशाची गरज आहे. एकाच वेळी उद्योग, घरगुती वापर आणि वाहतुकीसाठीही स्वच्छ ऊर्जा देणारे नवे दालन सुरू झाले असून त्यामुळे देशासाठी महत्त्वाची व्यवस्था सुरू झाली आहे. दाभोळ वीज कंपनी सध्या इंधनाअभावी वर्षभरात सहा महिनेच चालविली जाते. त्यामुळे राज्य शासनाला नुकसान सहन क रावे लागत आहे. आता नव्या प्रकल्पातून नियमित गॅसचा पुरवठा होणार असल्याने दाभोळ प्रकल्पही सतत चालविणे शक्य होईल. त्यामुळे ऊर्जानिर्मितीमध्ये भर पडेल. महाराष्ट्रातील या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी झाल्याने औचित्य साधले गेले आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यावेळी म्हणाले की, जयगड या बारमाही बंदरात जेएसडब्ल्यू उद्योग समूहाच्या आवारातच उभारण्यात आलेल्या एच एनर्जी प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. अशा तर्‍हेचे अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञान आपण स्वीकारले पाहिजे. देशाची प्रगती वेगाने होण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. कंपनी सोशल रिस्पॉन्सिबि लिटीअंतर्गत कंपनीकडून नळाद्वारे घरगुती गॅस जोडण्या देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कंपनीने स्थानिकांना, स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.

एच-एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक दर्शन हिरानंदानी यांनी प्रास्ताविक केले. समारोपाच्या वेळी हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यावेळी सांगितले की, यावर्षीच्या अखेरपर्यंत एलएनजी टर्मिनल कार्यान्वित होणार आहे. जागतिक दर्जाच्या इंजिनिअरिंग तसेच सुरक्षा मानकांचा अवलंब करून हे एलएनजी टर्मिनल उभारण्यात आले आहे. या टर्मिनलमधील स्टोअरेज, रिगॅसि फिकेशन, रिलोडिंग, फ्युएल बंकरिंग आणि ट्रक लोडिंग सुविधांमुळे देशातील उद्योगांची ऊर्जेची वाढती गरज भागणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर रिगॅसिफाइड एलएनजी दाभोळ वीज प्रक ल्पालाही पुरविला जाणार आहे. समारंभाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे प्रमुख सज्जन जिंदाल, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचे सहव्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बीव्हीजेके शर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.