Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यर्थिनींची निवड


प्रवरानगर प्रतिनिधी

राज्यपाल यांच्या सचिवालयाने निर्देशित केल्यानुसार औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात ‘आव्हान २०१८’ या राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २५ मे ते ३ जून २०१८ या कालावधीत होणार आहे.

या शिबिरासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रतीक्षा अभंग आणि कृषी महाविद्यालयातील ज्योती गायकवाड या विद्यर्थिनींची राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. प्रविण गायकर यांनी दिली.

या विद्यर्थिनींच्या यशाबद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे,विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश दळे आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. यासाठी प्रा. प्रविण गायकर, प्रा. संदीप पठारे यांनी विशेष परिश्रम घेतले.