Breaking News

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थितीः करण गायकर

नाशिकः दुर्गराज रायगडावर होणार्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जिल्ह्यातून पन्नास हजाराहून अधिक शिवप्रेमी हजेरी लावणार असल्याची माहीती शिवराज्याभिषेक समितीने पञकार परिषदेत दिली.


शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष युवराज छञपती खा.संभाजीराजे भोसले आणि बाळराजे युवराज शहाजी राजे यांच्या पुण्य उपस्थितीत येत्या सहा जून रोजी स्वराज्याचे स्फुल्लींग चेतविणार्या छञपती  शिवाजी राजे यांचा ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होत आहे.या सोहळ्यासाठी महाराष्ट्रच नव्हे देश विदेशात शिवप्रेमी एकच धुन सहा जुन हे ब्रिद घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीत व्यस्त आहे.नाशिकृ जिल्ह्यातील पन्नास हजाराहून अधिक शिवप्रेमी या सोहळ्याला हजर राहणार असल्याची माहीती सोहळा समितीचे सदस्य करण गायकर यांनी दिली.यावेळी गणेश कदम,तुषार जगताप,शिवाजी मोरे ,अमोल वाजे,नवनाथ शिंदे,ज्ञानेश्वर थोरात,विजय खर्जुल,विलास जाधव,मनोहर भामरे,किरण बोरसे विलास गायधनी,यश बच्छाव,सचिन शिंदे,राज भामरे,शिवजन्मोत्सव सातपूर विभाग समितीचे बाळा निगळ,पुंडलिक बोडके,सिडकोचे आशिष हिरे,धनाजी लगड,गणेश अरिंगळे,पंचवटीचे सचिन पवार,ना.रोडचे बंटी भागवत,मध्य नाशिकचे जितेंद्र चव्हाण यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
या सोहळ्याच्या पुर्वसंध्येला म्हणजे पाच जुन रोजी युवराज संभाजी राजे यांच्या प्रेरणेने दुर्गराज स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याने प्रत्येक शिवभक्तांने या मोहीमेत उस्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहनही शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीने केले आहे.