Breaking News

मागासवर्ग आयोगाला छावा क्रांती वीर सेनेची गळ

नाशिक/प्रतिनिधी - सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक प्रक्रीयेला वेग देण्याच्या ऊद्देशाने जिल्हा दौर्यावर आलेल्या मागासवर्ग आयोगासमोर छावा क्रांती वीर सेनेच्या पदाधिकार्यांनी आरक्षण का मिळावे या विषयी भुमिका मांडली छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयोगाला दिलेल्या निवेदनात समाजाच्या विद्यमान परिस्थितीचे विवेचन करणारे निवेदन सादर केले.


या निवेदनात म्हटले आहे की,राज्य व केंद्र शासनातील सर्व सेवांमध्ये मराठा समाजाला न्यायीक प्रतिनिधीत्व मिळाले नाही.या विषयीचा अनुशेष आयोगाच्या आकडेवारीत उपलब्ध आहे.मंञालयासह विदेश विभाग,केंद्रीय लोकसेवा आयोग,केंद्रीय सार्वजनिक क्षेञ,अंडरटेकींग,रेल्वे,सरकारी बॕका,रिझर्व्ह बँक,अशशा शेकडो शासाकीय निमशासकीय आस्थापनांमध्ये समाजाला अपूरे प्रतिनिधीत्व मिळाले आहे.मराठवाडा विभागातील सर्व मराठा समाज सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे,हे आयोगाच्या सर्व्हेक्षणात सिध्द झाले आहे.वैश्यवाणी,वाणी,माळी,वंजारी,धनगर,लेवा पाटील,लेवापाटीदार,गुजर,भावसार,यल्लम,या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातीपेक्षाही मराठा समाजाची सामाजिक आर्थिक प्रातिष्ठा खालावलेली आहे,ग्रामिण भागातील मराठा समाज सामाजिकदृष्ट्या एकाकी पडला आहे,प्रथा परंपरेत जखडलेल्या अपरिवर्तनशील आदीवासी स्वरूपाचे जीवन मराठा समाज सध्या जगत आहे.गडचिरोली आणि नंदूरबार सारख्या जिल्ह्यातील आदिवासी समाजाशी तुलना केल्यास केवळबोली भाषा आणि पेहराव वगळता मराठा समाजाचे एकूण जीवनमान आदीवासी समाजासारखे आहे.थोडक्यात हा मराठा समाज निम आदिवासी म्हणूनच ओळखला जातो.मराठा समाजाची ऐंशी टक्के लोकसंख्या अल्पभुधारक आणि भुमीहीन असून पोट भरण्यासाठी या समाजाला मोलमजूरी हि पर्याय उरला आहे.रिक्षा चालक,हमाल,उसतोड कामगार,गाडीवाला,कंञाटी कामगार,बांधकाम मजूर,बिगारी,रोजंदारी ,वीटभट्टी कामगार ,ठेल्यावाला अशी या समाजाची विद्यमान ओळख आहे.विशेष म्हणजे मराठा समाजाची मुळ ओळख कुणबी समाज अशी असून या समाजाची शेती हा परंपरागत व्यवसाय आजही मुख्य उपजिविकेचे साधन आहे.लोकसंख्येचे निम्मे प्रमाण असलेल्या महिला आजही सर्वदृष्टीने सर्वपातळीवर मागासलेल्या आहेत.हा समाज प्रथा परंपरा,शेती गाव नातगोत या जोखडात जखडलेला असून सांस्कृतिक सामाजिक बौध्दीक स्रीविषयक मानसिकता शैक्षणिक आर्थिक व प्रादेशिक मागासलेपण इतर ओबीसी जातीपेक्षा अधिक गंभीर आणि वेगळे आहे.तरीही हा समाज आरक्षण प्रक्रीयेपासून अद्याप दुर असल्याने समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याची विनंती निवेदनात केली आहे.
याशिवाय या निवेदनात काही ऐतिहासिक दाखलेही सादर करण्यात आले असून शासन निर्णयांचा ,वेळोवेळी स्थापन झालेल्या आयोगाचा गोषवाराही मांडण्यात आला आहेनाशिक/प्रतिनिधी
सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक प्रक्रीयेला वेग देण्याच्या ऊद्देशाने जिल्हा दौर्यावर आलेल्या मागासवर्ग आयोगासमोर छावा क्रांती वीर सेनेच्या पदाधिकार्यांनी आरक्षण का मिळावे या विषयी भुमिका मांडली.
छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयोगाला दिलेल्या निवेदनात समाजाच्या विद्यमान परिस्थितीचे विवेचन करणारे निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की,राज्य व केंद्र शासनातील सर्व सेवांमध्ये मराठा समाजाला न्यायीक प्रतिनिधीत्व मिळाले नाही.या विषयीचा अनुशेष आयोगाच्या आकडेवारीत उपलब्ध आहे.मंञालयासह विदेश विभाग,केंद्रीय लोकसेवा आयोग,केंद्रीय सार्वजनिक क्षेञ,अंडरटेकींग,रेल्वे,सरकारी बॕका,रिझर्व्ह बँक,अशशा शेकडो शासाकीय निमशासकीय आस्थापनांमध्ये समाजाला अपूरे प्रतिनिधीत्व मिळाले आहे.मराठवाडा विभागातील सर्व मराठा समाज सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे,हे आयोगाच्या सर्व्हेक्षणात सिध्द झाले आहे.वैश्यवाणी,वाणी,माळी,वंजारी,धनगर,लेवा पाटील,लेवापाटीदार,गुजर,भावसार,यल्लम,या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातीपेक्षाही मराठा समाजाची सामाजिक आर्थिक प्रातिष्ठा खालावलेली आहे,ग्रामिण भागातील मराठा समाज सामाजिकदृष्ट्या एकाकी पडला आहे,प्रथा परंपरेत जखडलेल्या अपरिवर्तनशील आदीवासी स्वरूपाचे जीवन मराठा समाज सध्या जगत आहे.गडचिरोली आणि नंदूरबार सारख्या जिल्ह्यातील आदिवासी समाजाशी तुलना केल्यास केवळबोली भाषा आणि पेहराव वगळता मराठा समाजाचे एकूण जीवनमान आदीवासी समाजासारखे आहे.थोडक्यात हा मराठा समाज निम आदिवासी म्हणूनच ओळखला जातो.मराठा समाजाची ऐंशी टक्के लोकसंख्या अल्पभुधारक आणि भुमीहीन असून पोट भरण्यासाठी या समाजाला मोलमजूरी हि पर्याय उरला आहे.रिक्षा चालक,हमाल,उसतोड कामगार,गाडीवाला,कंञाटी कामगार,बांधकाम मजूर,बिगारी,रोजंदारी ,वीटभट्टी कामगार ,ठेल्यावाला अशी या समाजाची विद्यमान ओळख आहे.विशेष म्हणजे मराठा समाजाची मुळ ओळख कुणबी समाज अशी असून या समाजाची शेती हा परंपरागत व्यवसाय आजही मुख्य उपजिविकेचे साधन आहे.लोकसंख्येचे निम्मे प्रमाण असलेल्या महिला आजही सर्वदृष्टीने सर्वपातळीवर मागासलेल्या आहेत.हा समाज प्रथा परंपरा,शेती गाव नातगोत या जोखडात जखडलेला असून सांस्कृतिक सामाजिक बौध्दीक स्रीविषयक मानसिकता शैक्षणिक आर्थिक व प्रादेशिक मागासलेपण इतर ओबीसी जातीपेक्षा अधिक गंभीर आणि वेगळे आहे.तरीही हा समाज आरक्षण प्रक्रीयेपासून अद्याप दुर असल्याने समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याची विनंती निवेदनात मराठा नेते शिवाजी भाऊ सहाणे, शिवा भाऊ तेलंग, शिवाजी राजे मोरे, नवनाथ भाऊ शिंदे, ज्ञानेश्वर भाऊ थोरात, किरण भाऊ बोरसे, विजय भाऊ खर्जूल यांनी केली आहे.
याशिवाय या निवेदनात काही ऐतिहासिक दाखलेही सादर करण्यात आले असून शासन निर्णयांचा ,वेळोवेळी स्थापन झालेल्या आयोगाचा गोषवाराही मांडण्यात आला आहे