Breaking News

खलबतखान्याच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचे श्रमदान


सातारा, दि. 16, मे - हिंदवी स्वराजाचे तिसरे छत्रपती शाहूमहाराज यांच्या दि. 18 मे रोजी होणा-या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या तख्ताच्या वाडयातून स्वराज्याचा कारभार अखंड हिंदुस्थानात झाला होता, त्या खलबतखान्याच्या स्वच्छतेसाठी सोमवारी शाहू उद्यानात दक्ष विचार मंचने आयोजित केलेल्या श्रमदान मोहिमेत मुख्याधिकारी शंकर गोरे, जि.प.सदस्य दीपक पवार, कॉ. किरण माने, ओमकार तपासे, सागर पावशे, प्रशांत आहेरराव आणि मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना कॉ. किरण माने यांनी संपूर्ण भारताचा कारभार पाहणार्या छत्रपती शाहूमहाराज यांनी याच जागेतून अनेक मोहिमांचे नियोजन केले. 

नामांकित सरदार मंडळी शाहूमहाराजांना ज्या सदरेवर मुजरे घालत, त्या सदरेचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली. सोबतच खलबतखान्याची माहीती गुरुदास आडगळे यांनी उपस्थितांना दिली. दक्ष विचार मंचने हा कार्यक्रम तडीस लावताना छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त कृतीशील कार्यक्रम आखल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. महेश पवार, प्रकाश भिसे, पद्माकर सोळवंडे, कुणाल पाटोळे यांच्यासह या श्रमदानात शनिवर पेठेतील बाल शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या सुमारे 30 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
18 मे रोजी सातारा नगरीचे निर्माते छत्रपती शाहूमहाराजांची जयंती तख्ताच्या वाड्यात साजरी केली जाणार असून यानिमित्ताने खलबतखान्यांच्या स्वच्छतेला वेग आला असल्याचे समाधान नाग रिकांनी व्यक्त केले.