Breaking News

तोरकडवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित प्रेक्षक भारावुन गेले. प्रेक्षकांनी बक्षिसांचा वर्षाव करुन चिमुकल्या बालकांच्या कलागुणांना चांगलीच दाद दिली.

उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. उपसरपंच सुखदेव भिताडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश धुमाळ, उपाध्यक्ष व माजी उपसरपंच ईश्‍वर तोरकड, उद्योजक मेघराज बजाज, माजी सरपंच शहाजी तोरकड, नाना नष्टे, प्रा. सुधीर तोरकड, सुनील तोरकड, शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिहू नृत्य, राजस्थानी नृत्य, मूकअभिनय, नाटिका आदी कलाविष्कार सादर केले. उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी नवनाथ दिवटे, सचिन वलेकर, अविनाश घोडके, सतिश खामगळ, मकरंद गडदे, गजेंद्र सुर्यवंशी, अजय सोनवणे, शरद पवार, सुरेश पवार आदींचे विशेष सहकार्य लाभले. 
बालकलाकारांनी सादर केलेल्या बहारदार सादरीकरणावर प्रेक्षकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. यामध्ये बक्षिसांच्या माध्यमातून 18 हजार रुपयांची रक्कम जमा झाली.