Breaking News

संत सावता महाराजांच्या विचारांची राज्याला गरज : विखे


आश्वी : संत शिरोमणी सावता महाराज हे संत परपरेतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत होते. पंढरपूरच्या पाडूरंगावर त्यांची असिम भक्ती होती. त्यामुळे प्रत्यक्षात पाडूरंग त्यांना भेटावयास आले होते. धार्मिक प्रबोधन व भक्तीप्रसाराचे व्रत त्यांनी आयुष्यभर जपले. त्यामुळे राज्याला संत सावता महाराज यांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील ताजणेमळ्यात संत सावता महाराज मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उब्रेश्वर व रामेश्वर देवस्थानचे मठाधिपती हभप दत्तगिरी महाराज याच्या हस्ते विरोधी पक्षनेते विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला. यानंतर उपस्थित भाविकांना सावता महाराज मित्र मंडळ आणि माळी समाज बाधंवाकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, शिवनेरी उद्योग समुहाचे भगवानराव ईलग, माधवराव गायकवाड, विनायकराव बालोटे, विजयराव चतुरे, नंदकिशोर कुलथे, मिलिंद बोरा, माजी सरपंच हरीभाऊ ताजणे, नवनाथ ताजणे आदींसह माळी समाज बांधव, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.