… आणि पोलीस ठाण्यातच त्यांची ‘दे दणादण’
श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आलेल्या नातेवाईकांमध्ये ठाणे अंमलदारासमोरच भांडणे झाली. पोलिसांनी तात्काळ या भांडखोर नातेवाईकांना ताब्यात घेतले. परंतु पोलीस ठाण्यात सासरा, जावई, मेव्हूना यांच्यात झालेल्या या मारामारीची चर्चा चांगलीच रंगली.
घरगुती वाद झाल्याने एक महिला तिच्या नातेवाईकांसोबत पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. त्याचवेळी त्या महिलेचा पतीदेखील तक्रार देण्यासाठी आला. तेव्हा त्याला तेथे पाहून संतप्त झालेल्या या महिलेच्या नातेवाईकांनी ठाणे अंमलदारासमोरच त्या जावई असलेल्या व्यक्तीला मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तात्काळ या दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना ताब्यात घेतले. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती व इतर काही नातेवाईकांविरोधात याआधी दिलेल्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराबाबत रात्री उशिरा कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. मुलीला मारहाण करणाऱ्या जावयला मेव्हूना व सासर्याने केलेल्या मारहाणीचा शहरात चांगलीच चर्चा रंगली.विशेष म्हणजे यातील मारहाण करणारी एक व्यक्ती सेवानिवृत्त पोलीस असल्याची माहिती मिळाली.