मुंबई: देशाच्या जडणघडणीत बांधकाम व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. सुंदर इमारती बांधून अधिकाधिक स्मार्ट शहरे निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. ते आज क्रेडाई-एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे आयोजित गोल्डन पिलर रिअल इस्टेट अवार्ड्स कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडांगणावर पार पडला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता उपस्थित होते.राज्यपाल म्हणाले, मुंबईत ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि सुंदर इमारती उभ्या राहिल्या. या शहराला सुंदर बनवले. आज मुंबई जगाच्या पातळीवर सुंदर शहर बनले असून देशाची अर्थिक राजधानी म्हणून नावलौकिक आहे. दोन कोटी लोकसंख्येचे हे शहर आता जगातिक दर्जाचे सुंदर शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे.