जिद्द व सचोटीच्या जोरावर मराठी महिला उद्योजकांची गगनभरारी.
येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ‘पुढचे पाऊल’ संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘मराठी महिला उद्योजक-अडचणींवरील मात’ या विषयावर परिसंवाद झाला. बंगळुरू येथील पूर्णब्रह्म फुड्सच्या व्यवस्थापकीय संचालक जयंती कठाळे, वात्सल्य फाऊंडेशनच्या स्वाती बेडेकर, महिको या बियाणे कंपनीच्या संचालक डॉ.उषा बारवाले आणि शिक्षणक्षेत्रात स्कूल डिझाईन संकल्पना राबविणाऱ्या दिल्ली येथिल उद्योजिका निवेदिता पांडे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.
