Breaking News

संजीवनीच्या आठ विद्यार्थ्यांची फोर्स मोटर्स मध्ये निवड : कोल्हे


कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनी पॉलिटेक्निकच्या 8 विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकालापुर्वीच सर्व क्षेत्रातील दळणवळणाची वाहने आणि शेती उपयुक्त ट्रक्टर्स बनविणार्‍या फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीने नोकर्‍यांसाठी आकर्षक पॅकेजवर निवड केली असुन, अंतिम निकालाची वाट न पाहता त्यांना आजपासुनच सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

त्याचबरोबर निवड झालेल्या शिवहारी कर्पे, प्रणिती विसपुते, नुश्रत शेख, भरत बोजगे, मोनाली भिंगारे, अक्षय म्हैस, योगेश मलिक व पूनम बेद्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. आय.के. सय्यद, आणि संजीवनीच्या प्रवेश मार्गदर्शन केंद्रात मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रा. मिरीकर म्हणाले की, 10 वी अथवा 12 वीची परीक्षा होताच पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या भेटी संजीवनी पॉलिटेक्निकच्या प्रवेश मार्गदर्शन केंद्रावर सुरू होतात. निवड झालेले सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटूंबातील आहेत. कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे तसेच संजीवनीच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना नोकरीस लावणे आहे, या ध्येयाने आत्तापर्यंत अनेक विध्यार्थ्यांना नोकर्‍या मिळवुन देण्यात संजीवनी पॉलिटेक्निकला यश प्राप्त झाले असुन, उर्वरीत इच्छुक विद्यार्थ्यांना येत्या 15-20 दिवसांत नोकर्‍या मिळवुन देण्यासाठी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे, असे प्रा. मिरीकर यांनी शेवटी सांगीतले.