Breaking News

आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग; सुदैवाने जीवित हानी टळली

नवी दिल्ली ते विशाखापट्टणमदरम्यान धावणाऱ्या २२४१६ अप आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या दोन बोग्यांना ग्वालेरच्या बिर्लानगर स्थानकाजवळ आग लागली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सकाळी पावणेबाराच्या सुमारास ग्वाल्हेरजवळील बिर्लानगर स्थानकाजवळ बी-६ व बी-७ बोग्यांना आग लागल्याचे दिसून आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. रेल्वेगाडीला त्वरित स्टार्टर सिग्नलजवळ थांबवण्यात आले. आगीमुळे आेव्हरहेड इलेक्ट्रिक वायरचे (आेएचई) नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी त्वरित अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आल्या. आग विझवल्यानंतर बी-५ बोगीपासून गाडी ग्वाल्हेर स्थानकावर आणली गेली.