Breaking News

सातारा-जावळीमध्ये भाजपचाच आमदार होणार - दीपक पवार


सातारा, दि. 12, मे - गत विधानसभा निवडणुकीत सातारा-जावली मतदार संघातून निवडणूक लढविताना सातारा शहरातील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजेपेक्षा मला मताधिक्य दिले होते. त्यावेळी भाजपचे सहा नगरसेवकही निवडून होते. सातारा-जावलीतील जनतेला परीवर्तन हवे आहे. मतदार संघात भाजपाला वातावरण अनुकूल आहे. पक्षाने निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा-जावलीचा आमदार हा भाजपाच असणार आहे असा दावा भाजपचे नेते दीपक पवार यांनी दिली.

दरम्यान खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, त्यांना भाजप पक्षात येण्याचा निर्णय हा त्यांचा आहे. वरिष्ठ पातळीवर नेते निर्णय घेतील याबाबत आम्हाला क ाही माहिती नाही असे पवार यांनी यावेळी सांगितले.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे जन संपर्क कार्यालय सदरबझार येथील पोलीस परेड मैदानाजवळ सुरू करण्यात येणार असून, या कार्यालायाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवार 12 रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती भाजप नेते दीपक पवार यांनी दिली. या कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चारेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातून मी निवडणूक लढणार असून, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून मला मतदार संघात कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी, लोकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी हे कार्यालय सुरू केले आहेे. भाजपने महु-हातेघर धरणाला 40 कोटीचा निधी देवून प्रश्‍न मार्गी लावला आहे. आता बोंडारवाडी धरणासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. बोंडारवाडी धरण झाले तर 56 गावांचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे पक्षाने या धरणाला प्राधान्य दिले आहे असे पवार यांनी सांगितले.