Breaking News

प्रजासत्ताक दिनी स्वच्छता अभियानाचा संदेश


सोनई/प्रतिनिधी /- 68वा प्रजासत्ताक दिना निमित्त २६ जानेवारीला नगर अर्बन बँकेने स्वच्छता अभियानाचा व शहिद जवानांना श्रद्धांजली तसेच गुणवंत विद्यार्थी व नागरिक यांचा गौरव करून एक प्रकारे सामाजिक उपक्रम राबवला.
प्रजासत्ताक दिनी व्यापारी राजेंद्र चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.बाबासाहेब शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सोनईचे पो.नि.किरण शिंदे हे होते. याप्रसंगी 26 जणांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व यशस्वी जबाबदारी केल्या बद्दल बँकेचे व्हा.चेरमन मा. शनिभक्त नवनीत भाई सुरपुरीया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दिवसभर देशभक्तीपर गीते सादर केली गेली. बँकेच्या वतीने व्यवस्थापक नानासाहेब तुवर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाद्वारे सामाजिक संदेश देऊन, सामाजिक कार्यकर्ते अंबादास राऊत, प्रकाश शेटे, माजी.सरपंच राजेंद्र बोरुडे, आघाव गुरुजी, सुभाष राख, सोमभाऊ बंग, बंडू भैय्या चंदेल, प्रा.राम कुरे, शिवाशेठ बाफना, शकील बागवान, प्रदीप चंगेडिया, सुभाष लुनीया, कैलासराव क्षीरसागर, डॉ.प्रेमसुख चंगेडिया, प्रा.अशोक दराडे, कवडे मेजर, नथु कुसळकर, ग्रा.प.सदस्य अनिल बाराहाते, प्रदीप चंगेडिया, विकास बल्लाळ,संतोष तेलोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.