एचडीएफसी बँकेच्या एटीएमला आग
पुणे - कात्रज चौकात असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरला आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत एटीएम सेंटरचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रन मिळवले. कात्रज चौकातील मोरे बागेजवळ हे एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे.
आज दुपारच्या सुमारास या एटीएमला अचानक आग लागली. काही वेळातच ही आग पसरली आणि एटीएममधील बॅटरी बॅकअप, एसी व कंट्रोल पॅनेल या आगीत जळाले आहेत. सुदैवाने एटीएम मशीनला आग लागली नसल्यामुळे आतील पैसे सुरक्षित आहेत, अशी माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली.
