Breaking News

पीएमआरडीएत विलीनीकरणास शिवसेनेचा विरोध - श्रीरंग बारणे

पुणे : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा (पीसीएनटीडीए) चे क्षेत्र पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. परंतु, या विलीनीकरणास शिवसेनेचा विरोध असून हा एकप्रकारे पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने अन्यायकारक निर्णय आहे, असा आरोप खा. श्रीरंग बारणे यांनी केला आहे. तसेच, प्राधिकरणाच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवी व हजारो कोटीची जमीन यावर डोळा ठेवून हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. खा. बारणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1972 मध्ये झाली पिंपरी-चिंचवड शहरातील गरीब कामगारांना घरे व स्वस्तात प्लॉट देण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली. प्राधिकरणाला 46 वर्षे पूर्ण झाली असून त्याचा ताबा धनिकांनी घेतला आहे. कवडी मोल किमतीत शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊनही आजतागायत 1984 पूर्वीच्या शेतकर्‍यांना जमिनीचा 12.5 टक्के परतावा सरकारने दिलेला नाही. राज्य सरकारने 2015 मध्ये पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे.