Breaking News

5 दहशतवाद्यांची भारतीय हद्दीत घुसखोरी

जम्मू -पाच दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे रोजी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत.बोगद्याचा वापर करुन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला. पाकिस्तानी रेंजर्सनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु बीएसएफने तो प्रयत्न हाणून पाडल्याची माहिती बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा यांनी दिली. मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे एक जवान शहीद झाला. पंतप्रधान मोदी 19 मे रोजी अनेक अ धिकृत कामांसाठी राज्याचा एक दिवसीय दौरा करणार आहेत.