प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी समाज व जनतेसाठी स्वत:च्या तत्वांशी व विचारांशी कधीही तडजोड केली नाही - मुख्यमंत्री
नागपूर : लाँगमार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत असताना स्वत:च्या तत्वांशी व विचारांशी कधीही तडजोड केली नाही. सर्व जातीधर्मांच्या व्यक्तीसोबत सलोखा निर्माण करतांनाच कुठेही कटुता निर्माण होऊ न देण्याच्या त्यांच्या गुणामुळे ते अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे ठरले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, प्रा. इ.मु. नारनवरे, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग सदस्या सुलेखा कुंभारे, गिरीष गांधी, अटल बहादुर सिंग, रंजनाताई कवाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.