Breaking News

'पुढचे पाऊल' या दिल्लीतील मराठी संस्थेला आवश्यक सर्व सहकार्य करु - महसूलमंत्री चंद्रकात पाटील


नवी दिल्ली : “महाराष्ट्र राज्याने देशाला खूप काही दिले आहे. आपली संस्कृती, कला, पर्यटन, 720 किलोमीटरचा समुद्री किनारा, जागतिक वारसा स्थळे आदी महाराष्ट्राची ओळख विश्वस्तरावर व्हावी, तसेच राज्याचा ठसा सगळीकडे उमटविण्यासाठीच्या अथक प्रयत्नांना, “पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी संस्थेला राज्य शासन सर्वपरीने सहकार्य करेल'' असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत सुरु असलेल्या दोन दिवसीय “महाराष्ट्र महोत्सवात” दिले.

‘पुढचे पाऊल’ ही दिल्लीतील संस्था व महाराष्ट्र शासनाच्या सयुंक्त विद्यमाने येथील कस्तुरबागांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात, श्री पाटील बोलत होते. यावेळी पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल, राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती, खासदार दिलीप गांधी ,परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव व पुढचे पाऊल संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर मुळे आणि महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला मंचावर उपस्थित होत्या.