खा. गांधींच्या वाढदिवसानिमित्त गॅस वाटप
पारनेर प्रतिनिधी - येथील संकेत गँस एजन्सी याठिकाणी ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत खा. दिलीप गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुका भाजपाच्यावतीने गोरगरीब गरजूंना मोफत गँसचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, ज्येष्ठ नेते वसंत चेडे, शहराध्यक्ष भिमाजी औटी, योगेश औटी, महेश ठुबे, रामदास नवले आदींसह शहरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.