Breaking News

टेनिस बॉल स्पर्धांमुळे ग्रामिण खेळाडूंच्या कलागुणांना वाव - निलेश लंके

सुपा / प्रतिनिधी । ग्रामिण भागात टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये बहुतेक संघ सहभाग नोंदवितात, क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध नसतांनाही खेळाडू भरपूर मेहनत घेतात, स्पर्धांमध्ये उतरल्यानंतर आपल्यातील गुण दाखविण्याची संधी त्यांना मिळत असते, त्यातुनच गुणवंत क्रिकेटपटू घडत असल्याचे प्रतिपादन लोकनेते निलेश लंके यांनी केले.


घाणेगाव ता. पारनेर येथिल क्रिकेट क्लब आयोजित भव्य हापपिच टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन निलेश लंके यांच्या हस्ते काल सकाळी 11 वाजता पार पडले यावेळी ते बोलत होते.
यावेळी घाणेगावच्या सरपंच मंदाकिनी वाबळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल वाबळे, निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश शिंगोटे, रामदास शिंदे, गिताराम सालके, रुपेश गुंड, विशाल म्हस्के, निलेश परांडे, गणेश परांडे आदी उपस्थित होते. घाणेगाव-वडनेर रस्त्यालगत पार पडणार्‍या या स्पर्धेसाठी निलेश लंके यांच्या वतीने प्रथम बक्षिस 11 हजार, पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, चेअरमन अनिल वाबळे यांच्या वतीने द्वितीय बक्षिस 9 हजार, रोहीत एंटरप्रायजेस पुणे, पोपट मारुती वाबळे यांच्या वतीने तृतीय बक्षिस 7 हजार, तर रामदास शंकर शिंदे यांच्या वतीने चतुर्थ बक्षिस 4 हजार रुपये देण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट खेळाडू यासाठी वैयक्तीक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
परिसरातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश शिंगोटे, संकेत वाबळे, बाळू म्हस्के, अमोल वाबळे, अभिषेक परांडे, कानिफनाथ शिंगोटे, नितीन वाबळे, योगेश शिंदे, शुभम म्हस्के, तुषार वाबळे, सौरभ वाबळे, विशाल म्हस्के, संदिप वाबळे, निलेश परांडे, गणेश शिंगोटे, गणेश परांडे, सिध्देश शिंगोटे यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.