Breaking News

उक्कलगावात डेगुं सदृश रुग्ण आढळला ?


श्रीरामपुर - उक्कलगाव परिसरातील धनवाट शिवारातील एका माहिलेला डेगुं सदृश आजाराची लागण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या महिलेला आधी श्रीरामपूर येथे रुग्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अहमदनगर येथील दिपक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

डॉक्टराच्या तपासात हा रुग्ण डेगुं सदृश रुग्ण आहे. असे निष्पण झाले आहे. सदर उक्कलगाव उपकेंद्राच्या आरोग्यसोविका लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडे डेगुं सदृश रुग्णांची नोंद नाही. सदर रुग्णाला पुढील तपासासाठी नगर येथे रुग्णालयात पाठविले असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. डेंगुचा रुग्ण सापडल्याने उक्कलगावात खळबळ उडाली आहे. रुग्णाला डेगुंची लागण पाण्यामुळे झाली असा प्राथमिक अंदाज आहे.