Breaking News

मराठी चित्रपटांनी भाषा समृद्ध केली - क्षितिज घुले


भातकुडगांव - महाराष्ट्राची भूमी चित्रपट क्षेत्राची जननी आहे. आज मराठी चित्रपटांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी व इतर भाषिक चित्रपटाशी मराठी चित्रपट तुलनात्मक दृष्टया सरस कामगिरी बजावत आहे याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन क्षितिज घुले सभापती शेवगाव पंचायत समिती यांनी सापते फिल्मस निर्मित पारी या चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी केले. भातकुडगाव येथे मारुती मंदिराच्या प्रांगणात पारी या मराठी चित्रपटाच्या चित्रकरणास सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. त्याच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना क्षितिज घुले यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले. 

घुले पुढे म्हणाले की समाजातील जातीव्यवस्था, विषमता या देशासाठी घातक ठरणार्‍या बाबींवर प्रबोधनात्मक संदेश चित्रपट निर्मिती द्वारे दिला जातो व ही काळाची गरज आहे . जुन्या काळात कलेस राजाश्रय मिळत असे .आज लोकशाही सरकारे कलेच्या वृद्धीसाठी अतोनात प्रयत्न करत आहेत . माझ्या कडून आपल्या कार्यास शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमप्रसंगी सिनेकलाकार नागेश भोसले , प्रकाश धोत्रे , प्रसाद आजगावकर, राजश्री गर्जे , आशिष ससाणे, सायमन भारस्कर ,निर्माते मारुती सापते, स्थानिक पदाधिकारी सर्जेराव नजन , एकनाथ काळे, अजय नजन, रामचंद्र घुमरे, सुभाष गर्जे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सापते यांनी केले.