पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक; शेवटच्या दिवशी 9 नामनिर्देशन पत्र दाखल
सांगली, दि. 11, मे - पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर, आजपर्यंत एकूण 12 उमेदवारांनी 14 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 11 मे तर, नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम 14 मे असा आहे. मतदान 28 मे व मतमोजणी 31 मे रोजी होणार आहे.
कालपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामार्फत विश्वजीत कदम व शांताराम कदम तर अपक्ष म्हणून प्रमोद पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल क रण्याच्या शेवटच्या दिवशी पुढीलप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये भाजपमार्फत संग्रामसिंह यादव देशमुख, पृथ्वीराज देशमुख व राजाराम गरूड, अपक्ष म्हणून सतिश पाटील, मोहन राऊत, अभिजीत वामनराव आवाडे, बजरंग धोंडीराम पाटील, विलास शामराव कदम यांनी तर हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने मिलिंद काशिनाथ कांबळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.