Breaking News

ऑनलाइन खरेदी करून 95 हजारांना गंडवले


सोलापूर, दि. 14, मे - बजाज फायनान्स कंपनीच्या कार्डवरून परस्पर ऑनलाइन खरेदी करून 95 हजार 839 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. चव्हाण हे शेती करतात. त्यांना एके दिवशी मोबाइलवरून ’मी बजाज फायनान्समधून बोलतोय’ असे सांगत कार्डबद्दल माहिती विचारली. काही दिवसांनी बजाज फायनान्स कार्डवरून 95 हजार 839 रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. 

विशेष म्हणजे चव्हाण यांनी कुठलीही वस्तू खरेदी केली नाही. ऑनलाइनद्वारे खरेदी करून फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत. असे प्रकार वाढत असल्याने बँक ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.