Breaking News

आयटी अभियंत्याचा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू


पुणे, दि. 14, मे - जिममध्ये पोहण्याचा सराव करणार्‍या 24 वर्षीय आयटी अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडली. गट्टूबल्ली भार्गव (वय-24,रा. हिंजवडी, मूळ आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे. 

तो हिंजवडी परिसरातील कॉग्निझंट कंपनीत कामाला होता. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत गट्टूबल्ली याने वाकड प रिसरातील एका खासगी जिममध्ये पोहण्याचा क्लास लावला होता. चार दिवसापूर्वीच त्याचा क्लास पूर्ण झाला होता. त्यानंतर तो रोज रात्री स्विमिंग टॅन्कवर येऊन पोहण्याचा सराव करत असे. नेहमीप्रमाणे तो पोहण्याचा सराव करत असताना अचानक तो बुडाला. तेथील कर्मचार्‍यांनी त्याला बाहेर काढले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.