Breaking News

भेदभाव न करता तो हक्क देण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी - मनीषा शिंदे


सोलापूर, दि. 14, मे - आरोग्य हादेखील मूलभूत हक्क असून इतर मूलभूत हक्काप्रमाणे महत्त्वाचा आहे. यासाठी रुग्णांची सेवा करताना नर्सेस यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तो हक्क देण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, असे प्रतिपादन राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा मनीषा शिंदे यांनी केले. 

सिव्हिल बी ब्लॉकमध्ये फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला. राज्य परिचारिका संघटनेने हा कार्यक्रम घेतला. ’परिचारिका : पुढे जाण्याचा आवाज- आरोग्य हा मानवी हक्क आहे’ या घोषवाक्याचे उद्घाटन अधिसेविका निर्मला साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.