Breaking News

देशातील 91 प्रमुख जलाशयातील पाणी साठयांत घट

नवी दिल्ली - देशातील 91 प्रमुख जलाशयातील पाण्याच्या साठ्याचे प्रमाण 1 टक्क्याने घटले आहे. महाराष्ट्रमध्ये मागील वर्षापेक्षा पाण्याचा साठा जास्त आहे.3 मेपर्यंत या 91 या जलाशयातील पाण्याचा साठा 35.219 बीसीएम इतका आहे. हे पाणी जलाशयांच्या एकूण क्षमतेच्या 22 टक्के आहे. 26 एप्रीलपर्यंत हा साठा 23 टक्के होता. या 91 जलाशयांची एकूण क्षमता 161.993 बीसीएम आहे जी एकूण साठवणुकीच्या क्षमतेच्या 63 टक्के आहे. या 91 पैकी 37 जलाशयांना 60 मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेची जलविद्युत सुविधा आहे. मागील वर्षीपेक्षा राजस्थान, प. बंगाल, त्रिपुरा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमीळनाडूमध्ये पाण्याचा साठा मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, झारखंड, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे.