Breaking News

निर्भया प्रकरण : फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. प्रकरणातील दोषी विनय शर्मा, पवन गुप्ता यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या निर्णायाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यापैकी आरोपी पवन आणि विनय यांच्या वकिलांनी बाजू मांडली. अन्य दोघांच्या वकिलांना बाजू मांडण्यासाठी येत्या मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. न्यायालयाने प्रकरणातील चार दोषी मुकेश, पवन, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत झालेल्या या अमानूष बलात्काराने अवघा देश हादरला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने झाली होती. या प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. त्यापैकी एक आरोपी राम सिंहने आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन होता. बालसुधारगृहात 3 वर्षाच्या शिक्षेनंतर त्याची सुटका झाली होती.