Breaking News

धनादेश वटला नाही, 84 हजारांचा गंडा


सोलापूर, दि. 14, मे - मुरारजी पेठेतील आशिष इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून तीन मोबाईल घेऊन पन्नास हजारांचा चेक दिला. तो चेकही वटला नाही, असे एकूण 84 हजारांची फसवणूक केल्याप्रक रणी रियाज अल्लोळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

विजय जिग्याणी यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली आहे. रियाज मागील पाच वर्षापासून वरील दुकानातून अनेक मोबाइल घेत आहेत. त्या- त्यावेळी पैसेही दिले आहे. 9 मे रोजी तीन मोबाइल घेतले. मी कमिशनवर मोबाइल विक्री करतो, असे सांगितले. त्यापोटी पन्नास हजारांचा चेक दिला. 34 हजार रुपये नंतर देतो, असे सांगितले. तो चेक बँकेत वटला नाही. एकूण 84 हजारांची फसवणूक केल्यामुळे तक्रार देण्यात आली आहे.