Breaking News

आरटीई : 396 जणांनी घेतला प्रवेश


सोलापूर, दि. 14, मे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल घटकातील मुलांना अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवण्यासाठी दुसरी सोडत राबवण्यात आली. या सोडतीत प्रवेश मिळालेल्या 396 जणांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या व दुसर्‍या सोडतीमध्ये मिळून 1107 जणांना प्रवेश मिळाला आहे. 

उर्वरित मुलांना प्रवेश घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. दुसरी सोडत शनिवारी काढली. त्यामध्ये 602 विद्यार्थ्यांची निवड झाली. प्राथमिकचे 515 व पूर्व प्राथमिकच्या 87 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरटीई प्रवेश संकेतस्थळावर 32 जणांचा अर्ज रिजेक्ट केले. 32 जणांनी प्रवेश घेतला नसल्याचे दिसते.