Breaking News

पोलिसांची दारु अड्यावर धाड, 6 लाखांवर माल केला नष्ट


भंडारा, दि. 05, मे - कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे 5 लाख रूपयांचा 500 किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला.

या धाडीत पोलिसांनी मोहाफुल सडवाचे प्लॉस्टिक ड्रम, प्लॉस्टीकचे पोते, मातीच्या माठांमध्ये भरलेली दारू, रबरी ट्युबमध्ये भरलेली दारू आणि दारु गाळण्याकरिता पाच लाखांचा 500 किलो मोहाफुल सडवा, 10 हजारांचे 20 लोखंडी ड्रम, 3000 हजारांचे 15 प्लॉस्टीक ड्रम, 3500 रूपयांचे दारु गाळण्याचे जर्मनी कटोरे, जळावू लाकडे, 10 रबरी ट्युबमध्ये भरलेली दारु असा 6 लाख 66 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर हे सर्व साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आले. वैनगंगा नदीकाठावर मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारु गाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु होते. परंतु ही कारवाई पहिल्यांदाच झाल्याचे दिसून आले आहे.
 
वैनगंगा नदीच्या पात्रापलिकडे दुर्गम स्थळी कुणी सहजासहजी येऊ शकत नाही किंवा कुणाच्याही नजरेस पडणार नाही. अशा ठिकाणी असलेल्या हा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कंकाळे हे अधिनिस्त पोलीस कर्मचार्यांना घेऊन एका डोंग्याच्या साहाय्याने नदीपात्र परिसर पिंजून काढला असता नदी पात्रातील वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या असल्याचे पोलिसांना आढळून आले.त्यानंतर ही कारवाही करन्यात आली.