अकोल्यात 30 लाखांच्या नकली नोटांसह चौघे गजाआड
अकोला, दि. 05, मे - अकोल्यात बनावट नोटांचे आमिष दाखवून लूटमार करणार्या टोळीचा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पर्दापाश केलाय. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असिफ खान शौकत खान 35, रा. कारंजा जि.वाशीम, कमल अफसर खान 28 रा. ता.दारव्हा जि. यवतमाळ, मोहंमद अब्दुल वकील 30 रा. ता.दिग्रस जी.यवतमाळ आणि हुसेन बग्गु 26 रा. दिग्रस जि. यवतमाळ या चौघांना अटक केली आहे तर एक महिला आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाली आहे.
चौघांकडून पोलिसांनी 30 ते 35 लाखाच्या नकली नोटा जप्त के ल्या आहेत. हि टोळी समोरच्या व्यक्तीला 30 लाखाच्या नकली नोटांचे आमिष दाखवायची आणि त्याबदल्यात 10 लाखाच्या खर्या(असली) नोटा घ्यायच्या अन पसार व्हायचं असा गोरखधंदा या टोळीचा होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक बनून अकोल्याच्या बसस्थानक परिसरातून चौघांना रंगेहाथ अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी 500 आणि 100 रुपयाच्या 30 ते 35 लाखांच्या नोटा जप्त केल्या. हि कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे आणि टीमने केली.