Breaking News

लोहगाव येथील लॉजवर छापा ; चार मुलींची सुटका


पुणे, दि. 14, मे - लोहगाव येथील लॉजवर छापा टाकून चार मुलींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी लॉज चालकास अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस नाईक सचिन कदम यांनी लोहगाव येथील तोरणा लॉजवर दिपक नावाचा व्यक्ती मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती दिली होती. 

त्यानुसार सामा जिक सुरक्षा विभागाने विमानतळ पोलिसांची मदत घेऊन लॉजवर छापा टाकला. यामध्ये पश्‍चिम बंगाल राज्यातील दोन व महाराष्ट्रातील दोन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना वेश्याव्यवसायाला लावणारे दीपक उर्फ गोविंद प्रसाद (27, रा. मध्यप्रदेश), दगडु खांदवे (रा. लोहगाव) लॉज मॅनेजर मनोज दोहरे (रा. मध्यप्रदेश) व भीमराव दोहरे (20, रा. मध्यप्रदेश) यांच्या विरुध्द अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईवेळी मनोज दोहरे व भीमराव दोहरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख 35 हजार, सात मोबाईल, हिशोबाच्या डायर्‍या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पीडित मुलींना महंमदवाडी येथील रेस्क्यु होममध्ये दाखल करण्यात आले आहे.