Breaking News

ईगल कंपनीने चोरला 500 ब्रास मुरूम ,शेतकर्‍याने पकडले रंगेहाथ


खामगाव, दि. 10, मे - शेगाव महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी चिंचोली गावाजवळ ईगल कंपनीने गौण खनिजाची चोरी केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असून शेतकरयांनी कंत्राटदाराची एक पोकलँड मशीन अडवून ठेवली आहे.

याबाबत हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार ईगल कंपनीकडून बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शेगाव या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी लागणारा मुरूम आणि माती शासकीय नियमानुसार कंत्राटदाराने परवानगी घेऊन वाहतूक करणे गरजेचे असतांना शेगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळी एका खाजगी शेतात कंत्रादाराने रात्रीच्या वेळेस जेसीबी, पोकल ँड द्वारे खोदून 10 टिप्पर चा करीत चोरून नेले. हि बात सकाळी गोपाळ निळे या शेतकर्‍याला समजताच त्यांनी सादर शेतात जाऊन पाहिले असता खोदकाम करून वाहतून जोरात सुरु असल्याचे दिसून आले. मात्र मालक आला असे पाहताच टिप्पर चालकांनी आपली वाहने पळवून नेली. मात्र एक पोकलँड शेतकर्‍याच्या हातही लागला असून ते ताब्यात घेण्यात आले आहे.