Breaking News

आग्रा येथे 43 जणांचा मृत्यू


ताजनगरीमध्ये बुधवारी रात्री 130 किलोमीटरच्या वेगाने वादळ आले. यावेळी वेगवान वार्‍यासह पाऊस व गारादेखील पडल्या. या वादळी पावसाने गावापासून शहरापर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली. तर पावसाने अनेक घरे जमीनदोस्त झाली. सर्वात जास्त नुकसान फतेहाबाद, बाह, पिनाहट आणि खैरागडमध्ये झाले आहे. या वादळाने उत्तरप्रदेशात आतापर्यंत 64 लोकांचा बळी घेतला आहे आणि अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.