Breaking News

औरंगाबाद हिंसाचारप्रकरणी 42 जणांना अटक

औरंगाबाद - दोन गटांत उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी एकूण 42 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या हिंसाचाराचा सूत्रधार अजूनही मोकाटच आहे. तरी शहरात चोख पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीच पोलीस प्रशासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औरंगाबादला भेट दिली. यावेळी त्यांनी हिंसाचारामधील पी डितांना सरकारने पूर्ण मदत द्यावी, अशी मागणी केली. जिल्ह्यातील 42 उपकेंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ’गट-ब’ची पूर्व परीक्षा रविवारी सकाळी 10 ते 12 या कालावधीत पार पडली आहे. औरंगाबादेतील घडलेल्या अप्रिय घटनेमुळे या परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली. शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आली आहे.